झानाडूचा पुण्यातील रिअल इस्टेट बाजारात प्रवेश

 
e

पुणे - मुंबई, बंगळुरू येथील रिअल इस्टेट बाजारपेठेत यश मिळवल्यानंतर या क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्थात्मक विकासातील तज्ञ झानाडू रिअॅलिटीने आपले कामकाज पुण्यात विस्तारण्याचे ठरवले आहे. स्थिर किंमती, कमी व्याजदर आणि सरकारी प्रोत्साहनामुळे गेल्या दशकभराच्या काळात येथे विक्रीला मदत झाली आहे. पुणे हे सर्वात वेगाने वाढणारे देशातील महानगर आहे. या बाजारात आम्हाला खूप क्षमता दिसत असून अनेक व्यावसायिक आणि मिलेनिअल्स या भागात घरे शोधत आहेत. ग्रेड ए विकासक या मागणीनुसार सेवा पुरवण्यास उत्सुक असल्याचे झानाडू रिअॅलिटीचे सीईओ श्री विकास चतुर्वेदी यांनी सांगितले.

या भागातील औद्योगिक वृद्धी आणि मुंबई-नाशिकला रस्त्याने जोडणारी कनेक्टिव्हिटी, यामुळे वाकड, पिंपरी चिंचवड, बावधन आणि वाघोली यासारख्या भागात घरांना बाजारात मोठी मागणी आहे. उच्च क्षमता आणि वित्तीय संस्था तसेच विकसकांकडून मिळणारी मोठी पसंती यामुळे झानाडू रिअॅलिटीने पुण्यातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये ब्रँडचा विस्तार करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

झानाडू हा रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक मार्केटिंग आणि विक्री तज्ञ असल्याने याच्या सोल्युशन्सद्वारे नेहमीच परिवर्तन घडवण्याचे प्रयत्न झाले आहेत. २०२० या वर्षाने व्यवसायातील चपळाईवर लक्ष केंद्रित केले आणि झानाडूने व्हर्चुअल विक्रीकरिता नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली. झानाडूची सहयोगी संख्या २०२० च्या सुरुवातीपासूनच दुप्पट झाली आहे. यातून मागील वर्षीचा विस्तार आणि वृद्धी दिसून येते. योग्य संधी आणि विकासाला प्रोत्साहन देत ही प्रतिभा जोपासण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नरत असतात. मागील वर्षात बंगळुरू आणि आता पुणे येथील विसस्ताराद्वारे, ते देशातील रिअल इस्टेट उद्योगात नवा ठसा उमटवण्याच्या तयारीत आहेत.

From Around the web