महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७० टक्के शाळा सुरु

पुणे कोरोना काळात बंद असलेल्या शाळा राज्यातील अनेक ग्रामीण भागात सुरु झाल्या आहेत. पुणे शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद असल्या तरी जिल्ह्यातील अनेक गावात शाळा सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील ७० टक्के ग्रामीण शाळा आता सुरु झाल्यात. या शाळांच्या वर्गांमध्ये १० लाख ६० हजार विद्यार्थी येऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढू लागली आहे. तीन आठवड्यांपूर्वी शाळा उघडल्यापासून आतापर्यंत दुपटीनं वाढली आहे.
२२ हजार २००हून अधिक शाळांमधील ५६ लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास १९टक्के विद्यार्थी वर्गात परतले आहेत. ७० टक्के शाळा पुन्हा उघडल्या आहेत. राज्य शिक्षण विभागाचे येत्या दोन आठवड्यांत सर्व शाळा पुन्हा सुरू करण्याचे लक्ष्य आहे.
राज्यात जळगावमध्ये सर्व शाळा उघडल्या आहेत. त्यांच्यात ५२.३ टक्के उपस्थिती होती. हिंगोलीनंतर पुणे जिल्ह्यात उपस्थितीची आकडेवारी कमी आहे. विद्यार्थी त्यांच्या खेड्यातून परत आले नसल्यानं पुणे जिल्ह्यात कमी प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी आपली भाड्याची घरे सोडली आहेत, ज्यामुळे मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा मागोवा ठेवणे हे एक मोठे काम आहे.