केजेज ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

निकाल १०० टक्के
 
केजेज ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे : येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्रथम पदवीधर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचा निकाल १०० टक्के लागला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत 'ट्रिनिटी'च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. ६७ टक्के विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, तर ३३ टक्के विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. महाविद्यालयात अव्वल आलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे गौरव करण्यात आला. महाविद्यालयात प्रथम आलेल्या प्राजक्ता पवार, विनया कोद्रे, मयुरी पाटील, स्नेहा कदम, प्रवीण सुतार या पाच विद्यार्थ्यांना सन्मानित केले. थिसीस मध्ये कौस्तुभ गाडगीळने प्रथम क्रमांक पटकावला. अव्वल आलेल्या पाच विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट प्रबंध सादर करणाऱ्या अशा सहा विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. 

संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या समारंभाला पुण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद माधव जोशी, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका विभावरी जाधव, कॅम्पस संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बी. एस. केशव यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कोरोनामुळे हा कार्यक्रम मर्यादित लोकांमध्ये घेण्यात आला. सोशल मीडियाद्वारे इतर विद्यार्थी व पालक यामध्ये सहभागी झाले होते. माधव जोशी म्हणाले, "आर्किटेक्चर हा कठीण अभ्यासक्रम आहे. त्यातून जाण्यासाठी परिश्रम, चिकाटी, धैर्यशीलता, नावीन्यपूर्णता आत्मसात करण्याची गरज असते." सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, तसेच कोविडमुळे पदवीप्रदान समारंभ कधी होणार हे माहित नसल्याने महाविद्यालयाने हा गुणगौरव समारंभ घेतल्याचे विभावरी जाधव यांनी नमूद केले. विभावरी जाधव यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

From Around the web