उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभास अभिवादन

पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक लढाईतील वीरांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र शौर्याची भूमी आहे. विजयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला देण्यात येईल. मागच्या सरकारने जो निधी मंजूर केला होता तो अद्यापही आलेला नाही. मात्र एकमेकांवर ढकलून चालणार नसल्याचेही ते म्हणाले.
करोनाच्या संकटामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरुनच विजयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सरकारच्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत आहे. सगळीकडे व्यवस्थित बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी सर्वांनी कोरोना काळात सुरक्षितता बाळगणे महत्त्वाचे असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.