मांजरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत ( Video)

 

मांजरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत ( Video)
संग्रहित छायाचित्र 


पुणे  - मांजरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत असून या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांनी  सावधानता बाळगण्याचे आवाहन पुणे  वन विभागाने केले आहे.

मांजरी खुर्द माहेर संस्था परीसर, कोलवडी भालसिंग वस्ती, शितोळे वस्ती परीसरात बिबट्याचा वावर वाढत चालला आहे. पाच सहा मेंढपाळाचे शेळी, पाळीव कुत्रे बिबट्या ने हल्ला करून ठार मारले आहेत.
               
मांजरी खुर्द परिसरात मांजरी खुर्द माहेर संस्था रोड (पवार वस्ती मार्ग) परीसरात कुटे यांच्या म्हैशीच्या गोट्या जवळ मंगळवार (११/०८/२०२०) काही ग्रामस्थ शेतात  चारचाकी वाहानाने विहिरीवर पाण्याची मोटार बंद करायला जाताना, रात्रीचे अकरा वाजण्याच्या दरम्यान चक्क ग्रामस्थांना बिबट्याचे अंधारात दर्शन झाले.

परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थाच्या वतीने होत असून वन विभाग पिंजरा लावण्याची मागणी मांजरी खुर्द, कोलवडी ग्रामस्थांच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.याबाबत हवेली वनविभागाशी संपर्क साधला असता परीसरात पुर्वी एक पिंजरा लावण्यात आला होता अशी माहिती देण्यात आली.

Video
मांजरी खुर्द परीसरात बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत
Posted by Pune Live on  Wednesday, August 12, 2020

From Around the web