भाविकांच्या दिंडीवर काळाचा घाला
वारकरी दिंडीत भरधाव पिकअप घुसल्याने 2 भाविक ठार तर २० जखमी

पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज यांचा यंदा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी आळंदीला जात असलेल्या भाविकांच्या दिंडीवर काळाने घाला घातला.
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्तिकी एकादशीच्या वारीला आळंदीकडे पायी जाणाऱ्या एका वारकरी दिंडीत भरधाव पिकअप घुसल्याने झालेल्या अपघातात 2 भाविक ठार तर 20 पेक्षा अधिक वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे.
सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त छोट्या ट्रॅक्टरला जोडलेल्या पालखीसह वारकऱ्यांची दिंडी पायीच आळंदीकडे चालली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी खालापूर तालुक्यातील उंबरे गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला पिकअपने जोराची धडक दिली.
खालापूरच्या उंबरगाव येथून ही दिंडी निघाली होती. माऊली चॅरिटेबल ट्रस्टची ही दिंडी आळंदीकडे पायी निघाली होती. कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी या दिंडीने प्रस्थान केले