आयपीओमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टींकडे द्या लक्ष

२०२० या वर्षापासून आपल्याला अनेक धडे मिळाले. त्यापैकी एक म्हणजे चांगले आर्थिक आरोग्य राखणे. यामुळे आपली अनेक संकटांतून बाहेर पडण्याची क्षमता वाढते. बाजारातील कोणत्याही संधीद्वारे आपण हे साध्य करू शकतो. उदा. मागील वर्षी तळ गाठल्यानंतर बेंचमार्क निर्देशांक ८०% पेक्षा जास्त वधारले आहेत. अनेक स्टॉक अनेक पटींनी वाढले तर काहींनी ७० पटींपेक्षा जास्त वृद्धी घेतली. पण या सर्वांमध्ये आपण कसे पुढे जायचे? आपले धोरण काय असले पाहिजे?
२०२१ मध्ये प्रवेश करण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPOs). आयपीओ म्हणजे काय आणि त्यासोबत कशी वृद्धी करायची याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मिडकॅप्स-एव्हीपी श्री अमरजीत मौर्य.
आयपीओ म्हणजे काय?:
एखाद्या कंपनीला निधी उभारण्याची गरज असते, तेव्हा इनिशिअल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओ काढला जातो. कंपनी सर्वजनिक गुंतवणुकीसाठी काही शेअर्स ‘इश्यु प्राइस’ वर खरेदी करतात. हा निधी उभारण्याचा उद्देश व्यवसाय वृद्धीपासून इतर धोरणात्मक उपक्रमांकरिता काहही असू शकतो. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) मध्ये कंपनी सर्व माहिती उघड करते. यात कंपनीची वित्तीय स्थिती व व्यवसाय शक्यतेपासून जबाबदाऱ्यांपर्यंतची माहिती असते. कोणत्याही इच्छुक गुंतवणूकदाराला ही माहिती वाचून त्यानुसार आयपीओमध्ये सहभागी व्हावे की नाही, हा निर्णय घेता येतो.
आयपीओ फायदेशीर असतात का?:
गुंतवणूकदारर आयपीओ कडे दोन वेगवेगळ्या पैलूंद्वारे पाहू शकतात. एक म्हणजेे शॉर्ट टर्म व दुसरा म्हणजे लाँग टर्म दृष्टीकोन. शॉर्ट-टर्ममध्ये इंसेन्टिव्ह असले तरीही कोणत्याही नव्या गुंतवणुकदाराने लाँग टर्मसह मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. तरीही आयपीओ किती चांगले असतात? या संदर्भात डेटा काय सांगतो?
मागील तीन महिन्यांत, एकूण ९ आयपीओ भारतात झाले. त्यातील नुकतेच पार पडलेले म्हणजे अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल, मिसेस बेकर्स फूड स्पेशॅलिटिज, बर्गर किंग इंडिया आणि ग्लँड फार्मा इत्यादी.
नोव्हेंबरमधील ब्लँड फार्मा (इश्यु प्राइस: १,५०० रुपये)चे मूल्य होते, आता तो २,४०० रुपयांपुढे व्यापार करत आहे. तर डिसेंबरमधील बर्गर किंग (इश्यु प्राइस: ६० रुपये) आता १७० रुपयांपुढे व्यापार करत आहे. मिसेस बेकर्स फूड स्पेशॅलिटीज (इश्यु प्राइस २८८ रुपये) आता ५०० रुपयांपुढे ट्रेडिंग करत आहे.
परिणाम असे असले तरीही आपण योग्य विश्लेषण न करता, पुढाकार घेत, आपले पैसे गुंतवू नये. कारण याला उलट बाजूदेखील आहे. उदा. नेट पिक्स शॉर्ट्स डिजिटल मीडिया (इश्यु प्राइस- ३० रुपये) ने गुंतवणूकदारांना शून्य परतावा दिला व तो सध्या ३० रुपयांच्या आसपासच व्यापार करत आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबरमधील बोधी ट्री मल्टिमीडिया (इश्यु प्राइस ९५ रुपये) हा आता ९६ रुपयांची उंची गाठून आता ७७.५० रुपयांवर पोहोचला आहे.
मग तुम्ही काय करायला हवे?:
शेअर बाजारात तुम्ही पूर्णपणे नवे असाल तर पुढील आयपीओ विषयी जास्तीत जास्त माहिती करून घ्या. डीआरएचपी अभ्यासण्याचे शिकून घ्या. ज्या कंपनीत गुंतवणूक करण्याचे नियोजन करत असाल, त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. डीआरएचपी हाच तुमचा बायबल बनला पाहिजे.
अत्याधुनिक एजब्रोकर्सची मदत घ्या. कारण ते त्यांच्या डेटा ड्रिव्हन पद्धतींद्वारे ते आयपीओ केंद्रित सल्ले देतात. याद्वारे तुम्हाला संबंधित मेट्रिक्ससह उत्तम पारदर्शकता मिळते. आयपीओ च्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सबक्रिप्शन रेट तपासला पाहिजे. सबक्रिप्शन चांगले असेल तर तो चांगले परतावे देण्याची शक्यता आहे. चांगले सबस्क्रिप्शन असण्याचा अर्थ असा की तो ओव्हरसबस्क्राब्ड आहे किंवा त्या पातळीवर आहे.
एकंदरीतच, ही प्रक्रिया नियमित केल्यास तुम्ही इक्विटी मार्केटमधील मूलभूत तत्त्वे समजून घेतल्यास या क्षेत्रात ग्रॅज्युएट व्हाल. आयपीओची प्राइस अॅक्शन (स्टॉकची किंमत कशा प्रकारे ट्रेड करेल) हा त्या तुलनेत लिस्टेड स्टॉक्सपेक्षा समजण्यास सोपी आहे. तुम्ही कंपनी्चया बाजूने कोणते घटक परिणाम करतात हे ओळखू शकाल. तसेच खरे मूल्य व अंदाज यातील फरकही कळेल. सर्वात चांगला भाग म्हणजे, तुम्ही ट्रेडिंग शकतानाच चांगले परतावे मिळवाल.
एक लक्षात ठेवा की, सर्वात भयंकर आर्थिक धक्का बसल्यानंतरही जगभरातील स्टॉक मार्केट वाढले असून आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चांकावर पोहोचले आहे. त्यामुळे आताच त्यात शामिल होणे आणि तुमच्या नव्या वर्षातील संकल्पात ते समाविष्ट करणे योग्य आहे.